lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते

उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते

Exercise For Increasing Height: कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने उभे राहतो, त्यामुळे मग आहे त्यापेक्षाही कमी उंचीचे दिसू लागतो.. त्यामुळेच तर आधी पोश्चर सुधारा, आहात त्यापेक्षा निश्चितच अधिक उंचीचे दिसाल..(how to increase height?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 04:20 PM2022-04-16T16:20:00+5:302022-04-16T16:21:00+5:30

Exercise For Increasing Height: कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने उभे राहतो, त्यामुळे मग आहे त्यापेक्षाही कमी उंचीचे दिसू लागतो.. त्यामुळेच तर आधी पोश्चर सुधारा, आहात त्यापेक्षा निश्चितच अधिक उंचीचे दिसाल..(how to increase height?)

3 Exercises that will helps to increase the height of children and improves the body posture of adults  | उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते

उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते

Highlightsलहान मुलांकडून नियमित हे व्यायाम करून घ्या. त्यांची उंची वाढण्यास नक्कीच मदत होईल.

सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोन यांच्याप्रमाणेच आपणही उंच, शिडशिडीत असावं असं अनेक जणींना वाटतं... कितीही नाही म्हटलं तरी उंचीच आकर्षण असतंच.. शिवाय उंच असणाऱ्या व्यक्तीची एक निराळीच छाप समोरच्या व्यक्तीवर पडते. पण आता नसूच आपण उंच तर मग काय करायचं? म्हणूनच तर करा हे काही सोपे व्यायाम. हे व्यायाम केल्यामुळे तुमचं बॉडीपोश्चर (how to improve body posture?) सुधारेल. लहान मुलांकडून नियमित हे व्यायाम करून घ्या. त्यांची उंची वाढण्यास नक्कीच मदत होईल. (how to look tall?)

 

आपल्या सभोवती आपण अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्यांची उंची तर चांगली असते. पण पाठीत बाक काढून चालल्यामुळे किंवा मग बसण्या- उठण्याची, चालण्याची ढब चुकीची असल्याने असे लोक उंची असूनही खूप प्रभावी दिसत नाहीत. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्यांचं चुकीचं बॉडी पोश्चर.. त्यामुळेच तर आहे त्या उंचीतही ऐटबाज दिसायचं असेल तर काही मोजके व्यायाम (exercise for increasing height) नियमित करायला हवेत. कोणते व्यायाम करायचे, याची सविस्तर माहिती इन्स्टाग्रामच्याtheyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

उंची वाढण्यासाठी लहान मुलांकडून करून घ्यायचे व्यायाम
१. सगळ्यात आधी तर ताठ उभे रहा. दोन्ही हात डोक्यावर सरळ घ्या आणि एकमेकांना जोडा. हात जोडलेले असतानाच एकदा डाव्या बाजुने तर एकदा उजव्या बाजुने कंबरेतून वाका. कंबरेतून वाकताना तुम्ही पाठीतून वाकत नाही  ना, याकडे लक्ष द्या. दोन्ही बाजुंकडून प्रत्येकी ५- ५ वेळा हा व्यायाम करावा.


२. दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायात साधारण एक वीत एवढं अंतर ठेवा. दोन्ही हात पाठीमागे घ्या आणि एकमेकांत गुंफा. यानंतर हात शक्य तेवढे मागे ओढा. हात मागे ओढताना खांदेही ताणले जातील याची काळजी घ्या. ५ ते ६ वेळा ही स्टेप करा.
३. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायात साधारण एक ते दिड फुट अंतर घ्या. आता एकदा मागच्या बाजुने वाका आणि त्यानंतर पुढच्या बाजुने झुका.. असे करताना मणक्याचे जास्तीतजास्त स्ट्रेचिंग हाेईल याची काळजी घ्या. साधारण ५- ५ वेळा हा व्यायाम करा. 

 

Web Title: 3 Exercises that will helps to increase the height of children and improves the body posture of adults 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.