Lokmat Sakhi >Fitness > व्यायामाला वेळ नाही, डाएटही जमत नाही? फक्त २ टिप्स, वजन होईल कमी- हे सोपं रोज करा

व्यायामाला वेळ नाही, डाएटही जमत नाही? फक्त २ टिप्स, वजन होईल कमी- हे सोपं रोज करा

2 Ways to Lose Weight When You Have No Time लाइफस्टाइलमध्ये हे दोन सोपे बदल करा, वजन वाढणार नाही आणि वाढलेलं येईल नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 01:06 PM2023-05-09T13:06:11+5:302023-05-09T13:06:32+5:30

2 Ways to Lose Weight When You Have No Time लाइफस्टाइलमध्ये हे दोन सोपे बदल करा, वजन वाढणार नाही आणि वाढलेलं येईल नियंत्रणात

2 Ways to Lose Weight When You Have No Time | व्यायामाला वेळ नाही, डाएटही जमत नाही? फक्त २ टिप्स, वजन होईल कमी- हे सोपं रोज करा

व्यायामाला वेळ नाही, डाएटही जमत नाही? फक्त २ टिप्स, वजन होईल कमी- हे सोपं रोज करा

खराब जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होते. खराब जीवनशैली बदलणे काहींना खूप कठीण जाते. वजन वाढणे, केसांच्या समस्या, आरोग्यावर इतर आजारांचा धोका निर्माण होणे, यासह इतर समस्या खराब जीवनशैलीमुळे उद्भवते. सध्या वजन वाढणे ही मुख्य समस्या बनली आहे. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला लठ्ठपणाची समस्या छळत आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे, हे खरंच खूप अवघड काम झालं आहे.

अनेक जण वजन कमी करण्यासाठी योग्य आहार, योगा व जिमला फॉलो करतात. काटेकोर जिम व पौष्टीक आहाराचे सेवन करूनही अनेकांचे वजन लगेच कमी होत नाही. आपल्याकडून कळत - नकळत काही चुका घडतातच. आपल्याला वजन कमी करायचे असेल तर, या दोन टिप्स फॉलो करा. या टिप्समुळे वजन नक्की नियंत्रणात येईल(2 Ways to Lose Weight When You Have No Time).

यासंदर्भात योगगुरू, अध्यात्मिक वक्ता, लेखक आणि संस्कृति दार्शनिक आचार्य प्रतिष्ठा यांनी, सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी वजन कमी करण्याचे २ आश्चर्यकारक मार्ग सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''असे अनेक लोकं आहेत, ज्यांना वेळेवर व्यायाम किंवा डाएटिंग करायला वेळ किंवा जमत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. पण या दोन गोष्टी फॉलो करा. याने नक्कीच तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळेल.''

चाळीशीनंतर महिलांचं वजन का वाढतं? वय वाढलं की वजन वाढतंच का? तज्ज्ञ सांगतात, एक उपाय

पहिला मार्ग

दिवसातून काही लोकं दोनदा किंवा तीनवेळा खातात. पण जेवल्यानंतर नेहमी फक्त २० मिनिटे शतपावली करा. स्वतःच्या घरात फेरफटका मारा. अनेकांना जेवल्यानंतर बसायची किंवा झोपायची सवय असते. या सवयीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढते. त्यामुळे जेवल्यानंतर निदान २० मिनिटे चाला.

दुसरा मार्ग

जेव्हा पण जेवायला बसाल तेव्हा कंबर सरळ ठेऊन जेवा. खाली वाकून किंवा आरामशीर बसून कधीही जेवू नये. कंबर सरळ ठेवून खाल्ल्याने भूक कमी लागते, तर आरामात बसल्याने किंवा वाकून जेवल्याने भूक जास्त लागते.

वजन कमी करायचंय, पोटावरची चरबी घटवायची तर करुन पाहा चिमूटभर दालचिनीचे ३ उपाय

इतर महत्वाचे टिप्स

- जेवण झाल्यावर कधीही सोफा-खुर्ची, पलंगावर जाऊन बसू किंवा झोपू नका. ज्यामुळे पचनास जड जाते.

- रात्रीचे जेवण संध्याकाळी सातच्या आधी करा. जास्तीत जास्त ८ च्या आधी रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.

- रात्रीचे जेवण एकदम हलक्या आहाराचे करा.

- जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. काही मिनिटानंतर पाणी प्या.

Web Title: 2 Ways to Lose Weight When You Have No Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.