Lokmat Sakhi >Beauty > ओपन पोर्समुळे चेहरा खूपच डल, वयस्कर वाटतोय? १ उपाय, ग्लोईंग, क्लिन चेहरा दिसेल

ओपन पोर्समुळे चेहरा खूपच डल, वयस्कर वाटतोय? १ उपाय, ग्लोईंग, क्लिन चेहरा दिसेल

Home Remedies For Open Pores : चेहऱ्यावर मोकळे छिद्र असण्याचे सर्वात मोठे कारण अनुवांशिक आहे. छिद्र मोठे किंवा लहान असणे देखील अनुवांशिक आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:27 PM2023-02-09T12:27:00+5:302023-02-09T12:27:53+5:30

Home Remedies For Open Pores : चेहऱ्यावर मोकळे छिद्र असण्याचे सर्वात मोठे कारण अनुवांशिक आहे. छिद्र मोठे किंवा लहान असणे देखील अनुवांशिक आहे

Home Remedies For Open Pores : Best Home Remedies For Open Pores on face | ओपन पोर्समुळे चेहरा खूपच डल, वयस्कर वाटतोय? १ उपाय, ग्लोईंग, क्लिन चेहरा दिसेल

ओपन पोर्समुळे चेहरा खूपच डल, वयस्कर वाटतोय? १ उपाय, ग्लोईंग, क्लिन चेहरा दिसेल

प्रदुषण, वातावरणतील बदलांमुळे चेहऱ्यावर ओपन पोर्स येतात.  पिंपल्स एक्नेमुळे चेहरा निस्तेज होऊन वयवाढीच्या खुणाही लवकर दिसायला लागतात. पार्लरच्या ट्रिटमेंट्सनी काहींना चेहऱ्यावर फरक दिसतो तर काहींचा चेहरा पुन्हा तसाच होतो. ओपन पोर्स घालवण्याासाठी काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याआधी ओपन पोर्स का येतात ते पाहूया. (Best Home Remedies For Open Pores on face)

ओपन पोर्स का येतात?

आपल्या त्वचेवर छोटी छिद्रे असतात, ही छिद्रे त्वचेचे नैसर्गिक तेल आणि घाम बाहेर काढतात. आपली त्वचा या छिद्रांमधून श्वास घेते. प्रत्येक छिद्रामध्ये एक केस कूप असतो. तसेच प्रत्येक छिद्रामध्ये तेल ग्रंथी असतात, ज्यामुळे सिबम तयार होते. जेव्हा ही छिद्रे मोठी होतात तेव्हा त्याला ओपन पोर्स म्हणतात. यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. सोबत त्वचेचे सौंदर्यही कमी होते.

चेहऱ्यावर मोकळे छिद्र असण्याचे सर्वात मोठे कारण अनुवांशिक आहे. छिद्र मोठे किंवा लहान असणे देखील अनुवांशिक आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर छिद्र खुले असतील तर ही समस्या तुमच्या मुलामध्येही होऊ शकते. तसेच, जर तुमच्या पालकांना ओपन पोर्सची समस्या असेल तर तुम्हालाही हे होऊ शकते.

सिबम चेहऱ्याच्या केसांच्या कूप किंवा छिद्रांमधून त्वचेच्या बाह्य पृष्ठभागावर पोहोचते. सिबम त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. पण जेव्हा सिबम जास्त प्रमाणात तयार होतो तेव्हा त्यामुळे चेहऱ्यावर छिद्रे पडतात. म्हणजेच, जास्त सिबम तयार झाल्यामुळे छिद्र मोठे होतात.

ओपन पोर्स येऊ नयेत म्हणून काय करायचं?

१) तेलकट उत्पादनांचा वापर करू नका

२) झोपण्याआधी मेकअप काढून झोपा

३) चेहरा दिवसातून २ वेळा केमिकल फ्री फेसवॉशनं धुवा

४) क्लीजिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजिंग ही स्टेप फॉलो करा.

५) ओपन पोर्सपासून त्वचेला वाचवण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस मास्कचा वापर करा.

६) ओपन पोर्ससाठी तुम्ही होममेड फेस मास्क वापरू शकता. 
 

Web Title: Home Remedies For Open Pores : Best Home Remedies For Open Pores on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.