उन्हाळ्यात आपली त्वचाच नाही तर केसही प्रचंड प्रमाणात खराब होतात. घाम, धुळीमुळे केस कोरडे, निर्जीव आणि राठ होतात. अनेकजण केसांचा मऊपणा परत मिळवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करुन हेअर स्पा करतात.(Hair Care Tips) पण या रासायनिक ट्रीटमेंटचा परिणाम अवघ्या काही दिवसांपर्यंत असतो. पण यामुळे आपल्या केसांचा पोत देखील खराब होतो.(Best hair mask for rough hair in summer) आपल्यालाही केस नैसर्गिकरित्या अधिक रेशमी, चमकदार आणि मजबूत करायचे असतील स्वयंपाकघरातील दही हा सगळ्यात सोपा पर्याय आहे. (Curd and honey mask for shiny hair)
दह्यात असणारे घटक टाळूला स्वच्छ करण्यास मदत करतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. आपण नुसते दही लावण्याऐवजी त्यात काही घटक मिसळून लावल्यास त्याचा प्रभाव दुप्पट होतो.(Home remedies for faster hair growth) उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी हा एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. दह्यामध्ये नेमक्या कोणत्या ३ गोष्टी मिसळल्याने आपले केस हेअर स्पा केल्यासारखे सुंदर दिसू शकतात पाहूया.
मनासारखी प्रगती होत नाही- बॉस सतत रागावतो? करा ७ गोष्टी, टार्गेट होईल पूर्ण- प्रमोशनही मिळेल
हेअर मास्क बनवण्याची पद्धत
1. सगळ्यात आधी आवळा, मेथी दाणे आणि कांद्याच्या बिया स्वच्छ धुवून भिजत घाला. दुसऱ्या दिवशी हे सर्व पदार्थ गाळून घ्या आणि कडक उन्हात सुकवा. वाळल्यानंतर सर्व साहित्यांची मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट तयार करा. ही पावडर तव्यावर ठेवून पूर्ण काळी होईपर्यंत चांगली भाजून घ्या. तयार झालेली पावडर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. ही भिजवलेली पेस्ट दुसऱ्या दिवशी दह्यामध्ये मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या टाळूपासून मुळांपर्यंत लावा.
2. हा मास्क लावण्यापूर्वी टाळू पूर्णपणे स्वच्छ असायला हवी. टाळू स्वच्छ नसेल तर आधी केस धुवून घ्या आणि त्यानंतरच मास्क लावा. हा मास्क केसांच्या टोकांपासून ते मुळांपर्यंत व्यवस्थित आणि सर्व बाजूंनी लावा. हा मास्क काही वेळ केसांवर तसाच राहू द्या आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवा.
3. दह्यातील प्रथिनांमुळे केसांना नैसर्गिक चमक येते, ज्यामुळे केसांची चमक वाढते. या मिश्रणामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची खुंटलेली वाढ दुप्पट वेगाने होऊ लागते. उन्हामुळे केस राठ होतात, हा मास्क केसांना लावल्याने केस मऊ होतात. दह्यातील अँटी-फंगल गुणधर्म कोंडा नष्ट करण्यास मदत करतात.
