Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केस चमकदारही होतील आणि मुलायम सुद्धा, पाहा लिंबाचा रस कसा केसांसाठी ठरतो वरदान

केस चमकदारही होतील आणि मुलायम सुद्धा, पाहा लिंबाचा रस कसा केसांसाठी ठरतो वरदान

Benefits of Lemon for Hair : केसांची काळजी घेण्याचा मुद्दा समोर आला की, जास्तीत जास्त लोक घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देतात. कारण त्यांचा परिणाम अधिक चांगला बघायला मिळतो. लिंबाचा वापर वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:25 IST2026-04-23T11:25:16+5:302026-04-23T11:25:42+5:30

Benefits of Lemon for Hair : केसांची काळजी घेण्याचा मुद्दा समोर आला की, जास्तीत जास्त लोक घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देतात. कारण त्यांचा परिणाम अधिक चांगला बघायला मिळतो. लिंबाचा वापर वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये केला जातो.

Benefits of applying lemon juice on hair and know how to apply it | केस चमकदारही होतील आणि मुलायम सुद्धा, पाहा लिंबाचा रस कसा केसांसाठी ठरतो वरदान

केस चमकदारही होतील आणि मुलायम सुद्धा, पाहा लिंबाचा रस कसा केसांसाठी ठरतो वरदान

Benefits of Lemon for Hair : उन्हाळ्यात प्रखर सूर्यकिरणे, घाम आणि धूळ-मातीमुळे केस फारच खराब होतात. घामामुळे तर केस चिकट आणि निर्जीव होतात. अशात केस तुटूही लागतात. त्यामुळेच या दिवसात केसांची अधिक काळजी घेण्याचा सल्ला हेअर एक्सपर्ट देत असतात. केसांची काळजी घेण्याचा मुद्दा समोर आला की, जास्तीत जास्त लोक घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देतात. कारण त्यांचा परिणाम अधिक चांगला बघायला मिळतो. लिंबाचा वापर वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये केला जातो. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी सुद्धा लिंबाचा वापर भरपूर महिला करतात. व्हिटामिन सी, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि सिट्रिक अॅसिडसारख्या तत्वांमुळे लिंबू केसांसाठी वरदान ठरतं. अशात लिंबाच्या रसाने केसांना काय फायदे मिळतात आणि ते केसांवर कसं लावावं हे पाहुयात.

कोंड्यापासून मुक्ती

लिंबामध्ये अँटी-फंगल गुण असतात, जे केसांमध्ये कोंडा निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. यातील आम्लीय गुणांमुळे टाळूची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत मिळते.

तेलकटपणा दूर होतो

अनेकांच्या टाळूंची त्वचा तेलकट असते, ज्यामुळे खूप चिकटपणा जाणवतो. अशात लिंबाचा रस हा चिकटपणा कमी करण्यास मदत करतो.  

केस चमकदार होतात

लिंबातील गुणांमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं, ज्यामुळे केस चमकदार आणि मुलायम होतात.

केसांची वाढ

लिंबामध्ये असलेल्या व्हिटामिन सी ने कोलेजनचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केसांची वाढही भरभर होते.

लिंबाचा रस केसांवर कसा लावाल?

लिंबू आणि कोबऱ्याचं तेल

२ मोठे चमचे कोमट खोबऱ्याच्या तेलात १ मोठा चमचा लिंबाचा रस घाला. ही मिश्रण टाळूवर लावून साधारण ५ ते १० मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. २० मिनिटांनंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने केस धुवा. या उपायाने केसांमधील कोंडाही दूर होईल.

लिंबू आणि अॅलोव्हेरा

केस मुलायम आणि चमकदार हवे असतील तर २ मोठे चमचे अॅलोव्हेरा जेलमध्ये १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण मास्कसारखं केसांच्या मुळात लावा. याने केस हायड्रेट ठेवण्यास आणि चमकदार करण्यास मदत मिळेल.

लिंबू आणि दही

एक वाटी दह्यामध्ये अर्धा लिंबू पिळा. हे मिश्रण केसांवर सगळीकडे आणि मुळांना लावा. ३० मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने धुवा. दही आणि लिंबाच्या रसाचं हे मिश्रण नॅचरल कंडिशनरसारखं काम करतं.

Web Title : नींबू: चमकदार और मुलायम बालों का राज, एक प्राकृतिक वरदान।

Web Summary : नींबू का रस रूसी, तैलीयता से लड़ता है और बालों के विकास को बढ़ावा देता है। सर्वोत्तम परिणामों के लिए नारियल तेल, एलोवेरा या दही के साथ प्रयोग करें। एक सरल, प्रभावी बालों की देखभाल का उपाय।

Web Title : Lemon: The secret to shiny, soft hair, a natural boon.

Web Summary : Lemon juice combats dandruff, oiliness, and promotes hair growth. Use with coconut oil, aloe vera, or yogurt for best results. A simple, effective hair care solution.