उरणचा लंडनमध्ये डंका! लक्ष्मी शर्मा 'मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३'च्या स्पर्धेत द्वितीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 20:32 IST2023-05-29T20:29:11+5:302023-05-29T20:32:19+5:30
लंडन येथे झाली स्पर्धेची अंतिम फेरी

उरणचा लंडनमध्ये डंका! लक्ष्मी शर्मा 'मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३'च्या स्पर्धेत द्वितीय
मधुकर ठाकूर, उरण: उरणमधील लक्ष्मी शर्मा हिने लंडनमध्ये २६ मे रोजी पार पडलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. उरण येथे वास्तव्य व उच्च शिक्षण घेतलेल्या लक्ष्मी शर्मा लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या स्पर्धेत सहभागी झाली होती.या स्पर्धेत तिने अंतिम फेरीत धडकही मारली होती.
२६ मे रोजी लंडन येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.या अंतिम फेरीत लक्ष्मी शर्मा द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तिच्या या यशाने उरणकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल आई-वडिल, निकटवर्तीय काका पाटील आणि विविध स्तरांवरुन शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.