थरावरून पडून मुलगी जखमी, अलिबागमधील वेश्वि गावातील घटना

By राजेश भोस्तेकर | Updated: September 7, 2023 16:58 IST2023-09-07T16:57:52+5:302023-09-07T16:58:36+5:30

रायगड जिल्ह्यात गुरुवारी गोपाळकाला सण उत्साहात साजरा होत असताना एक गोविंदा तरुणी थरावरून पडल्याची घटना घडली आहे.

Girl injured after falling from dahihandi, incident in Veshvi village in Alibaug | थरावरून पडून मुलगी जखमी, अलिबागमधील वेश्वि गावातील घटना

थरावरून पडून मुलगी जखमी, अलिबागमधील वेश्वि गावातील घटना

अलिबाग - अलिबाग तालुक्यातील वेश्वि गावातील संदीप म्हात्रे यांची मुलगी तिसऱ्या थरावरून पडून जखमी झाल्याची घटना गुरुवारी गोपाळ काला सणाच्या दिवशी घडली आहे. मुलीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनीप्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

रायगड जिल्ह्यात गुरुवारी गोपाळकाला सण उत्साहात साजरा होत असताना एक गोविंदा तरुणी थरावरून पडल्याची घटना घडली आहे. वेश्वि गावातील संदीप म्हात्रे यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या घरी दहीहंडी लावली होती. दहीहंडी फोडण्यासाठी कुटुंबातील मुले इतर सदस्य यांनी थर लावले. म्हात्रे यांची मुलगी ही तिसऱ्या थरावर चढली होती. त्यावेळी तिचा तोल जाऊन खाली पडली. बाजूला उभा असलेल्या व्यक्तीने तिला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती हातावर पडून खाली जमिनीवर पडली. 

थरावरून जमिनीवर पडल्याने तिला मार लागून जखमी झाली. तातडीने कुटुंबाने अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलगी घाबरलेली असून आणि डोक्याला, अंगाला मार लागल्याने मुंबईला हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार कुटुंबाने रुग्णवाहिकेने एमजीएम रुग्णालयात नेले.

Web Title: Girl injured after falling from dahihandi, incident in Veshvi village in Alibaug