जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माध्यम कक्षास भेट

By निखिल म्हात्रे | Published: March 19, 2024 08:54 PM2024-03-19T20:54:44+5:302024-03-19T20:55:02+5:30

जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी मंगळवारी भेट देऊन कक्षाच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली.

Collector Kishan Javale visited the media room | जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माध्यम कक्षास भेट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माध्यम कक्षास भेट

अलिबाग - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ३२ रायगड लोकसभा मतदार संघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती आणि आणि माध्यम कक्ष (MCMC) जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी मंगळवारी भेट देऊन कक्षाच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली.

जिल्हाधिकारी जावळे यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया  आणि प्रिंट मीडिया विभागांची पाहणी केली व आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क व दक्ष राहून आपल्या जबाबदार्‍या पार पडाव्यात अशा सुचना किशन जावळे यांनी दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीसाठी माध्यम कक्षाबाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देऊन येथे सेल्फी काढला.

Web Title: Collector Kishan Javale visited the media room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.