कौतुकास्पद! उरणच्या दहा वर्षीय चिमुरड्यांची चमकदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 17:10 IST2023-12-04T17:09:15+5:302023-12-04T17:10:14+5:30
धरमतर ते करंजा हे १८ किलोमीटर समुद्री अंतर ५ तास १३ मिनिटांत पार केले.

कौतुकास्पद! उरणच्या दहा वर्षीय चिमुरड्यांची चमकदार कामगिरी
मधुकर ठाकूर, उरण :करंजा येथील मयंक दिनेश म्हात्रे या दहा वर्षीय चिमुरड्याने रविवारी पहाटेच्या सुमारास धरमतर ते करंजा हे अंतर पोहून पार केले आहे.
प्रशिक्षक हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील धरमतर येथून सुमारे १८ किमी अंतर पोहताना समुद्राच्या लाटांवर स्वार झाला होता. तर, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या उपस्थितीत अलिबाग आणि उरण दरम्यानच्या मुख्य चॅनलमध्ये पोहत अंतर गाठण्यास सुरुवात केली होती.
यावेळी पोहणाऱ्या मयंक याला इतर जलतरणपट्टूंचीही साथ लाभली. समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर पुढे जात सुमारे ५ तास १३ मिनिटांनी करंजा जेट्टीपर्यंतचे अंतर यशस्वीरीत्या पोहून पार केले. मयंक याचे अभिनंदन करीत अनेकांनी शुभेच्छा दिल्या.