करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास तांडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2023 18:57 IST2023-06-30T18:57:11+5:302023-06-30T18:57:25+5:30
करळ ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास पांडुरंग तांडेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास तांडेल
मधुकर ठाकूर
उरण: करळ ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास पांडुरंग तांडेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. करळ ग्राम सुधारणा मंडळाच्या २०२३-२४ या वर्षासाठी शुक्रवारी (३०) कार्यकारणी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली.या मंडळाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत शंकर तांडेल, सेक्रेटरीपदी देवेंद्र वसंत तांडेल तर खजिनदारपदी वासुदेव हरिश्चन्द्र तांडेल यांची निवड झाली आहे.
मंडळाच्या पंच कमिटीच्या सदस्यपदी संतोष हिराजी तांडेल,हिराचंद्र बाळाराम तांडेल,प्रमोद दत्तात्रेय तांडेल, रत्नाकर तांडेल, जितेंद्र बाळाराम कडू,विजय चिंतामण तांडेल,कमळाकर बाळाराम कडू,राजेश प्रकाश कडू यांची निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी समर्थक, हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.