विशेष मुलांनी बनविल्या सुंदर, आकर्षक पणत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2023 19:11 IST2023-11-01T19:10:51+5:302023-11-01T19:11:15+5:30
उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानतर्फे चालवीत असलेल्या सीबर्ड स्वीकार विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी सुंदर, आकर्षक पणत्या बनविल्या आहेत.

विशेष मुलांनी बनविल्या सुंदर, आकर्षक पणत्या
मधुकर ठाकूर
उरण: उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानतर्फे चालवीत असलेल्या सीबर्ड स्वीकार विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी सुंदर, आकर्षक पणत्या बनविल्या आहेत. या सुंदर पणत्या २० ते १०० रुपये दोन नग दराने पणत्या विकल्या जात आहेत.शाळेतील विद्यार्थी दर वर्षी राख्या ,पणत्या ,तोरण ,पाकीट ,आहेर पाकीट , कागदी पिशव्या आदी बनवीत असतात . विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंना उरण शहरातील सेंट मेरी, युईएस ,श्रीमती भागुबाई चांगु विद्यालय ,नवदुर्गा नवरात्र मंडळ बोरी ,तसेच डीपी वर्ड कंपनी यांच्या कडून मोठी मागणी असते.या उपक्रमासाठी उरण तालुक्यातील समाजसेवक , दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळत असल्याची माहिती संचालिका माधुरी उपाध्ये यांनी सांगितले.या कामासाठी शाळेच्या माधुरी उपाध्ये,पल्लवी परदेशी ,मानसी पांचाळ ,राकेश म्हात्रे , प्रशांत कदम ,गणेश जाधव ,स्नेहल राणे ,माधुरी मयेकर आदी शिक्षक-शिक्षिका मुलांवर मेहनत घेऊन मार्गदर्शन करीत आहेत.
१ सप्टेंबर १९९९ रोजी बेलापूर येथील श्रीमती शिरीष पुजारी यांनी उरण येथे अवघ्या ५ मुलांपासून विशेष मुलांसाठी शाळा सुरु केली होती.आज या शाळेत ४० विद्यार्थी शिकत आहेत .शाळेत एकूण चार वर्ग असून ३ शिक्षक ,५ कर्मचारी आहेत. ,शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वर्ग मुलांच्या कलागुणांन वाव देण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत.