उरणमध्ये संतप्त शिवसैनिकांची राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2022 17:07 IST2022-11-21T17:07:02+5:302022-11-21T17:07:52+5:30
५० खोके माजलेत बोके,५० खोके एकदम ओके अशा राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

उरणमध्ये संतप्त शिवसैनिकांची राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी
मधुकर ठाकूर
उरण: महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान केल्याप्रकरणी सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे मुख्य प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात संतप्त झालेल्या उरणच्या शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली.
५० खोके माजलेत बोके,५० खोके एकदम ओके अशा राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारून काळे फासले.राज्यपालांच्या प्रतिमेला लाथाही मारल्या. उरण तालुका शिवसेनेच्या वतीने शहर शाखेच्या समोर रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर व जिल्हा उपाध्यक्ष नरेश रहाळकर यांचे नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात महिला व शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.