PMC Elections : उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस;शक्ती प्रदर्शनामुळे क्षेत्रीय कार्यालयालास जत्रेचं स्वरूप
By किरण शिंदे | Updated: December 30, 2025 15:31 IST2025-12-30T15:29:48+5:302025-12-30T15:31:03+5:30
तब्बल ९ वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे.

PMC Elections : उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस;शक्ती प्रदर्शनामुळे क्षेत्रीय कार्यालयालास जत्रेचं स्वरूप
पुणे - महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटच्या दिवशी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल करत असल्यामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल ९ वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे.

त्यातच बंडखोरांना थोपविण्यासाठी राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता मागच्या दाराने उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची खेळी खेळली आहे. साहजिकच अर्ज दाखल करायचा दिवस उजाडत आला तरी आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही याचा उमेदवारांना थांगपत्ता नव्हता. मात्र, रविवारी मध्यरात्री पासून अनेक पक्षांनी उमेदवारांना गुपचूप बोलावून एबी फॉर्मचे वाटप सुरू केल्याने काहींनी सोमवारी तर उर्वरित सर्व इच्छुकांनी... हलगीचा कडकडाट जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्यामुळे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयालास जत्रेचं स्वरूप आलं आहे.