Gold Rate Today: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भाव मात्र वाढला; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:51 PM2021-10-26T17:51:33+5:302021-10-26T18:02:55+5:30

एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना, सोन्याच्या दरांमध्ये मात्र काही दिवसांपासून घसरण नोंदवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव स्थिर आहेत. परंतु भारतीय बाजारांमध्ये काही प्रमाणात घसरण दिसून येत आहे.

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,७७० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,७६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६६,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७७० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,७७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,३१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६६० रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.