या पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास खरेदी करताना होणार नाही फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:54 PM2018-11-01T20:54:39+5:302018-11-01T21:05:47+5:30

सणासुदीच्या दिवसांत अनेकांना खरेदीची घाई झालेली असते. मात्र अशी खरेदी करत असताना फसवणूक होण्याची शक्यता असते. मात्र या पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची फसवणूक होणार नाही.

कमी किंमत -बऱ्याचदा दुकानदार एखाद्या वस्तूची अगदी कमी किंमत सांगून ती तुम्हाला घेण्यास भाग पाडतात. मात्र तुम्हाला त्या वस्तूची आवश्यकता असेलच तर अशी वस्तू खरेदी करा.

डिस्काऊंट - एखाद्या वस्तूवर डिस्काऊंट मिळतो आहे, असे म्हटल्यावर ग्राहकांच्या उड्या पडतात. मात्र बऱ्याचदा डिस्काउंट नाही तर आपली फसवणूक झालीय हे लक्षात येते. त्यामुळे डिस्काउंटपासून सावधान.

बरेच व्यावसायिक एखाद्या सर्व्हिसनंतर दुसरी सर्विस घेण्यास भाग पाडतात. त्यामुळे गरज असेल तरच अशा सर्व्हिसचा लाभ घ्याय.

बऱ्याचदा खरेदीला गेल्यावर तेथील विक्रेते, सेल्समन तुमच्या निवडीचं कौतुक करतात. त्यामुळे हुरळून जाऊन अधिकची खरेदी केली जाते. मात्र दुकानदारांच्या अशा स्ट्रॅटर्जीपासून सावध राहा.

लिमिटेड स्टॉकचा धाक - बऱ्याचदा दुकानदारांकडून लिमिटेड स्टॉकचा धाक दाखवला जातो. मात्र अशा लिमिटेड स्टॉकची चिंता करून घाईगडबडीत खरेदी करू नका.