मुंबईतील उंच गणेशमूर्तींचा इतिहास...! पहिली उंच मूर्ती कुणी साकारली?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:50 AM2023-09-15T11:50:24+5:302023-09-15T12:24:56+5:30

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा अशा उंच मूर्तींची काही क्रेझ नव्हती. मग मुंबईत गणपतीच्या मूर्तीची उंची वाढली कशी? आता तर उंच मूर्तींचं प्रस्थ इतकं वाढलंय की मंडळांमध्ये गणेशमूर्तीच्या उंचीची स्पर्धाच भरते.

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा अशा उंच मूर्तींची काही क्रेझ नव्हती. मग मुंबईत गणपतीच्या मूर्तीची उंची वाढली कशी?

सन १९७७ मध्ये लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने म्हणजेच गणेशगल्लीनं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलं होतं. त्यावेळी सुप्रसिद्ध मूर्तीकार मास्तर दिनानाथ वेलिंग यांनी भारतातील पहिली २२ फुटी गणेशमूर्ती साकारली होती.

कमळावर विराजमान असलेल्या या महाकाय मूर्तीनं मुंबईकरांचं लक्ष वेधलं होतं आणि संपूर्ण शहरात चर्चा झाली. मास्तर वेलिंग यांच्या कलेची ताकद म्हणजे मूर्तीची भव्यता तर होतीच पण मूर्तीत असा सजीवपणा साकारत की सर्व गणेशभक्त मंत्रमुग्ध होत.

गणेशगल्ली मंडळाचा १९८१ सालचा २२ फूटी उंच बाप्पा.

मास्तर वेलिंग यांनी गणेशगल्लीच्या मंडळासाठी १९७७ ते १९८९ या १३ वर्षात वेगवेगळ्या रुपातील २२ फुटी गणेशमूर्ती साकारल्या होत्या. २२ फुटी गणेशमूर्तीची मुहूर्तमेढ याच मंडळानं रोवली त्यामुळे आजही बोल बोल बोल २२ फुटवाले की जय अशी घोषणा मंडळाकडून दिली जाते.

खेतवाडी ११ व्या गल्लीतील मंडळानं २००७ रोजी साकारलेला उंच बाप्पा. हीच गल्ली पुढे मुंबईचा महाराजा म्हणून प्रसिद्धीस आली.

खेतवाडी ११ व्या गल्लीतील मंडळाची २००६ सालची उंच गणेशमूर्ती.

२००३ सालचा मुंबईचा महाराजा...अर्थात खेतवाडी ११ व्या गल्लीचा उंच बाप्पा. मंडळानं दरवर्षी उंच गणेशमूर्ती साकारण्याची प्रथा कायम ठेवली.

मुंबईचा महाराजा मंडळाकडून दरवर्षी ३० ते ३५ फुटी मूर्ती साकारल्या जाऊ लागल्या.

मंडळानं २००१ मध्ये २५, ३० नव्हे ४२ फूट उंच मूर्ती साकारुन नवा विक्रम केला. विष्णू अवतारातील ही मूर्ती पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

मुंबईचा महाराजा मंडळानं २०२२ साली तब्बल ३८ फूट उंच बाप्पा साकारला.

मुंबईचा महाराजा मंडळानं यंदा तर थेट ४५ फुटांचा बाप्पा साकारण्यात आलाय. ही मूर्ती मूर्तिकार कृणाल पाटील यांनी साकारलीय.