मुंबईत एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनवरील थरकाप उडवणारी घटना कॅमे-यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 02:44 PM2017-09-29T14:44:08+5:302017-09-29T15:04:31+5:30

मुंबईत एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला.

दुर्घटनेतील जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

या दुर्घटनेनंतर केईएम रुग्णालयात एकच गर्दी झाली होती.

पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केईएम रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

केईएम रुग्णालयात जखमींची नाव फलकावर लावण्यात आली आहेत.