बेल्जियमचा बाप्पा... इको फ्रेंडली मूर्ती, मिरवणूक अन् संस्कारांचा वारसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 06:30 PM2019-09-10T18:30:42+5:302019-09-10T18:35:26+5:30

यंदाही बेल्जिअम मराठी मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात येते.

बेल्जियमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाची खासियत म्हणजे, बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती. बाप्पाची ही सुंदर मुर्ती मुळच्या पुण्याच्या पण बेल्जियममध्ये स्थायिक झालेल्या राजश्री पतंगे यांनी तयार केली आहे.

परदेशात असूनही बेल्जियम मराठी मंडळ आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी येथे महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असते. विशेषतः बाप्पाला आवडणारे मोदकही तयार करण्यात येतात.

जसा महाराष्ट्रात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो, त्याचप्रकारे बेल्जिअममध्येही साजरा करण्याचा मानस आणि आयोजन संयोजकांनी केल्याचं मंडळाच्या अध्यक्ष अनुश्री चेंबुरकर यांनी कळवलं आहे.