... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का!

भारताचा सलामीवीर शिखर धवन याची पत्नी आयशा मुखर्जी ही एक किक बॉक्सर आहे आणि आजही ती फिटनेसची भरपूर काळजी घेते.

27 ऑगस्ट 1975मध्ये भारतात तिचा जन्म झाला. आयशाचे वडिल बंगाली आहेत आणि आई ब्रिटिश.. त्यामुळे आयशाकडे दोन देशांचे नागरिकत्व आहे.

आयशाचे आईवडिल बंगालमध्ये एकत्र काम करायचे आणि त्याच दरम्यान त्यांच्यात प्रेम झालं, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आयशाच्या जन्मानंतर तिच्या आईवडिलांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. फिटनेसच महत्त्व जाणणारी आयशा किक बॉक्सर आहे.

आयशा ही धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे आणि धवनच्या फिटनेसची ती प्रचंड काळजी घेते. आयशाचं पहिलं लग्न हे ऑस्ट्रेलियातील एका व्यावसायिकाशी झालं होतं आणि त्यांना दोन मुली आहेत.

पहिल्या पतीशी नातं तुटल्यानंतर आयशा आणि धवनची फेसबूकवर मैत्री झाली आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांना जोरावर नावाचा मुलगा आहे.

धवननं आयशाच्या दोन्ही मुलींना स्वतःचं नाव दिलं आहे. आयशा नेहमी स्पोर्ट्स लूकमध्ये दिसत आहे. लहानपणापासून तिला खेळाची आवड होती.

लहानपणी तिचं शारीरिक शोषण झालं होतं आणि आयुष्यातील त्या भयावह आठवणी असल्याचे, आयशानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

त्या प्रसंगानंतर तिनं स्वतःला अधिक कणखर केलं आणि किक बॉक्सिंग शिकली. तिनं क्रिकेट आणि फुटबॉलही खेळले आहे.