भारताला युवा विश्वचषक जिंकवून देणारे 'हे' चार कर्णधार सध्या करतायत तरी काय...

मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली भारताने २००० साली युवा विश्वचषक जिंकला होता. सध्याच्या घडीला कैफ निवृत्त झाला असून तो समालोचन करत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००८ साली युवा विश्वचषक जिंकला होता.

विराट हा सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे.

उन्मुक्त चंदने युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतकी खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला होता. पण सध्याच्या घडीला उन्मुक्त हा कुठेही दिसत नाही.

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ साली युवा विश्वचषक जिंकला होता. उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. सध्या पृथ्वी भारतीय संघाचे दार ठोठावत आहे.