द्विशतकवीर विराट कोहलीचे सर्व विक्रम, फक्त एका क्लिकवर

विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासह सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही कोहलीने पिछाडीवर सोडले.

सचिन आणि सेहवाग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सहा द्विशतके लगावले होते. कोहलीने या सामन्यात सातवे द्विशतक झळकावले.

भारताकडून सर्वाधिक द्विशतके लगावण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर असेल.

कोहलीने सातव्या द्विशतकासह सात हजार धावाही पूर्ण केल्या.

सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 सामने खेळले. या 200 सामन्यांमध्ये सचिनने 53.78 च्या सरासरीने 15921बनवले आहेत. कोहलीने आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम नोंदवला आहे. कोहलीने जेव्हा 104 धावा केल्या तेव्हा त्याने 6904 धावा केल्या होत्या, यावेळी त्याची सरासरी होती 53.93.

कसोटी कारकिर्दीमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत 6868 धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज दमदार फलंदाजी करत वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एका महान कर्णधार रिकी पाँटिंगशी बरोबरी केली आहे