विराट कोहली - अनुष्का शर्माची लव्ह स्टोरी; लहानपणीच पडले होते एकमेकांच्या प्रेमात!

प्रेमाला वयाचं बंधन नसतं... कोणीही आणि केव्हाही प्रेमात पडू शकतं... फेब्रुवारी हा महिना प्रेमीयुगुलांचा महिना म्हणून ओळखला जातो. जगभरात प्रेमीयुगुल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारी अर्थात 'व्हॅलेंटाईन डे'ची आतुरतेनं वाट पाहत असतात.

आज आपण क्रिकेटमधील सर्वात क्युट कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत. टीम इंडियाचा कर्णधार कोहली आणि बॉलिवूडची आघाडीची नायिका अनुष्का यांच्या लव्ह स्टोरीतील असं गुपीत जे आतापर्यंत कुणालाच माहीत नव्हतं.

अनुष्काची आजी उर्मिला यांनी हे गुपीत सांगितलं. उत्तराखंड येथे राहणाऱ्या उर्मिला यांनी सांगितलं की,''अनुष्का आणि विराट हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. अनुष्काचे संपुर्ण कुटूंब विराटचा चांगले ओळखते. अनुष्का लहान असताना विराट जेव्हा घरी यायचा, तेव्हा दोघं भरपूर क्रिकेट खेळायचे. ते दोघं लहानपणीच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.''

अनुष्काही सर्वात लहान नात आहे आणि तिच्या आजी-आजोबांची लाडकी आहे. तिच्या आजीला विराट लहानपणापासूनच आवडायचा. त्यामुळे विराट-अनुष्काच्या नात्याला त्यांनी विरोध केला नाही.

त्यांनी पुढे सांगितले की,''अनुष्काचे वडील सैन्यात अधिकारी होते. ते बंगळुरु येथे राहत असताना अनुष्काचा भाऊ कर्णेशही क्रिकेट खेळायचा. तेव्ही विराटही त्याच्यासोबत होता. तेव्हा विराट अनेकदा कर्णेशसोबत घरी यायचा.

डिसेंबर 2017मध्ये विरुष्कानं इटलीमध्ये गुपचुप लग्न केलं होतं.