विराट कोहली आहे तरी कुठे? अनुष्का शर्मासोबतचे फोटो व्हायरल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघातून त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

भारताला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर क्रिकेटचाहते विराट आहे तरी कुठे? असा प्रश्न विचारत आहेत आणि आम्ही त्याचा शोध लावला आहे.

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत भटकंतीला गेला आहे. क्रिकेटपासून विश्रांती घेणाऱ्या विराटनं प्रत्येक क्षण पत्नीला देण्याचे ठरवले आहेत. त्यामुळे हे दोन्ही कपल फिरायला गेले आहेत.

विराट-अनुष्का हे कपल भूटानमध्ये फिरताना दिसले आणि तेथील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विराट-अनुष्का येथे स्थानिकांशी संवाद साधताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे 5 नोव्हेंबरला विराटचा वाढदिवस आहे आणि तो भूटानमध्येच त्याचं सेलिब्रेशन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.