ValentinesDay2020 : सचिन तेंडुलकरवर पहिल्याच नजरेत घायाळ झाली होती अंजली, त्यानंतर केलं असं काही...

सचिन आणि अंजली यांनी नजरानजर मुंबईच्या विमानतळावर झाली होती. त्यावेळी सचिन लंडनहून मुंबईला आला होता.

पहिल्याच नजरेत सचिन अंजलीच्या मनात भरला होता. सचिनसाठी काहीही करायला अंजली तयार झाली होती. त्यावेळी अंजली सचिनची स्वाक्षरी घेण्यासाठी त्याच्या मागे धावली, पण...

सचिन जास्त काळ सार्वजनिक ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे सचिन त्यावेळी विमानतळावरून झटपट गाडीत बसला आणि निघाला. त्यामुळे अंजलीला त्याची स्वाक्षरी मिळू शकली नव्हती.

बरेच प्रयत्न करून अंजलीने सचिनचा पाठलाग केला. एकदा तर खोटी पत्रकार बनून ती सचिनच्या घरीही गेली होती.

या पहिल्या भेटीनंतर सचिन आणि अंजली यांचे पाच वर्षे अफेअर सुरु होती. सचिन त्यावेळी बिझी असल्यामुळे त्यांना जास्त वेळ भेटताही आले नाही.

हे अफेअर सुरु असताना सचिनने याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते. पण हे अफेअर सुरु असताना दोघांनी पहिला सिनेमा पाहिला, त्याचे नाव होते रोजा.

सचिन आणि अंजली यांनी १९९४ साली न्यूझीलंडमध्ये साखरपुडा केला. त्यावेळी सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती समजली.

अंजली ही सचिनपेक्षा सहा वर्षांनी मोठी असली, तर दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यामुळेच त्यांनी १९९५ साली लग्न केले.

अंजली ही एक गुजराती उद्योगपती आनंद मेहता आणि ब्रिटिश सामाजिक कार्यकर्ते अनाबेल मेहता यांची मुलगी आहे. सचिनचे सासरे हे सातवेळा नॅशनल ब्रिज चॅम्पियन ठरलेले आहेत.

सचिनला अर्जुन आणि सारा ही दोन मुलं आहेत. अर्जुन सध्या क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.