एका डावात 1,107 धावा; क्रिकेटमधील चक्रावून टाकणारे पाच विक्रम!

क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम सर जॅक हॉब्स यांच्या नावावर आहे. त्यांचा हा विक्रम कोणी मोडेल असे वाटतही नाही. सर जॅक हॉब्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेमध्ये 61,760 धावा केल्या आहेत.

विलफ्रेड ऱ्होड्स हे नाव अनेकांनी एकलेही नसेल. या क्रिकेटपटूनं जवळपास 1110 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि त्यात त्यांनी 4204 विकेट्स घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय सर्वाधिक शंभर शतकांचा विक्रम भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण, तेंडुलकरच्या जन्मापूर्वी जॅक हॉब्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 199 शतकांचा विक्रम केला आहे.

व्हिक्टोरिया क्लबने एका डावात 1107 धावांचा विक्रम केला आहे. व्हिक्टोरिया संघाने 190 षटकं खेळून काढताना न्यू साऊथ वेल्स संघाविरुद्ध एका डावात 1107 धावा केल्या होत्या. त्यांच्या सलामीवीरांनी 375 धावांची भागीदारी केली होती, तर दुसऱ्या विकेटसाठी 219 धावां जोडल्या होत्या.

बिल पोनस्फोर्डने सर्वाधिक 352, तर जॅर रेडरने 295 धावा चोपल्या होत्या.

एकीकडे एका डावात खोऱ्यानं धावा चोपण्याचा विक्रम आहे, तर दुसरीकडे डावात केवळ 6 धावांची नामुष्कीही संघावर ओढावली आहे. 218 वर्षांपूर्वी बीएस संघ आणि इंग्लंड यांच्यात हा प्रथम श्रेणी सामना झाला होता. बीएससंघाने पहिल्या डावात 137 धावा करताना इंग्लंडचा पहिला डाव 100 धावांत गुंडाळला. 37 धावांच्या आघाडीसह बीएस संघ दुसऱ्या डावात मैदानावर उतरला. पण, त्यांना केवळ एकच धाव करता आली. जे. लॉरेल आणि सी ब्रिजर यांनी प्रत्येकी एक, तर जे वेल्सने चार धावा केल्या. बीएसला दुसऱ्या डावात केवळ एकच धाव करता आली.