हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 क्रिकेटर्स; जाणून घ्या, विराटसह कुणाची कमाई किती?

विराटचा बीसीसीआयसोबत वार्षिक करार केवळ ७ कोटींचा आहे. याउलट २०१८ पासून आयपीएलमध्ये आरसीबी त्याला दरवर्षी १७ कोटी रुपये देत आहे. जगात ‘यूथ आयकॉन’असलेल्या विराटची ब्रॅन्ड व्हॅल्यू मोठी आहे. (These are the top 5 highest earning cricketers)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वार्षिक कमाई करण्यात इंग्लंडचे खेळाडू आघाडीवर आहेत. भारतीय कर्णधार या पाचही खेळाडूंच्या तुलनेत भारतीय कर्णधार विराट कोहली बराच मागे आहे. विराटचा बीसीसीआयसोबत वार्षिक करार केवळ ७ कोटींचा आहे. याउलट २०१८ पासून आयपीएलमध्ये आरसीबी त्याला दरवर्षी १७ कोटी रुपये देत आहे. जगात ‘यूथ आयकॉन’असलेल्या विराटची ब्रॅन्ड व्हॅल्यू मोठी आहे. फोर्ब्स पत्रिकेच्या २०२० च्या यादीत वार्षिक १९६ कोटी इतक्या कमाईसह पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये विराट ६६ व्या स्थानी होता, हे खरे आहे. पण केवळ क्रिकेट बोर्डाकडून मिळणाऱ्या रकमेचा विचार केल्यास कोहलीच्या तुलनेत अनेक खेळाडू पुढे दिसतात. त्यांच्या कमाईवर एक नजर...

ज्यो रुट - इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार ज्यो रुट याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने वार्षिक ७.२२ कोटी रुपयात करारबद्ध केले आहे. जगातील सर्व कसोटी संघांत सर्वोच्च रक्कम रुटला मिळते. कोहली जाहिराती आणि इतर माध्यमातून कमाई करीत असला तरी ईसीबीकडून त्याला मिळणारी रक्कम विराटपेक्षा अधिक आहे.

जोस बटलर - स्टोक्स आणि आर्चर यांच्यासारखाच यष्टिरक्षक- फलंदाज जोस बटलर हा सर्व तीनही प्रकारात खेळतो. ईसीबी त्यासाठी वर्षाला १९ कोटी रुपये मोजते. जोस हा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सचा उपकर्णधार असून इंग्लिश कसोटी संघाचे उपकर्णधारपदही त्याच्याकडेच आहे. जाहीरातींमधूनही जोस मोठ्या रकमेची कमाई करतो.

बेन स्टोक्स - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आर्चरसारखाच तीनही प्रकारात खेळतो. २०१३पासून त्याने संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिले. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला ईसीबीने ८.७५ कोटींचा करार दिला आहे. ईसीबी स्थानिक सामन्यांसाठी नवी करार पद्धत अमलात आणणार असून स्टोक्सची रक्कम वाढू शकेल.

स्टीव्ह स्मिथ - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ असलेला स्टीव्ह स्मिथ लोकप्रिय चेहरा आहे. तो तीनही प्रकारात खेळत असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्याशी २९.५० कोटींचा करार केला. विराटप्रमाणे ऑस्ट्रेलियातील विविध ब्रॅन्डचा ॲम्बेसिडर आहे. २०१८च्या चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे.

जोफ्रा आर्चर - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने २०१९च्या विश्वचषकात सुपर ओव्हरमध्ये किमया करीत देशाला प्रथमच जेतेपदाचा मान मिळवून दिला. आर्चर तीनही प्रकारात खेळत असल्याने रुटच्या तुलनेत त्याची कमाई अधिक आहे. त्याची कमाई ९.३९ कोटी एवढी आहे.