IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवानंतर सुहाना खानचे फोटो व्हायरल

शुक्रवारी झालेल्या सामन्यात ५ बाद ६१ अशा संकटात सापडलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) पॅट कमिन्स- इयॉन मॉर्गन या जोडीनं बाहेर काढलं. KKRनं २० षटकांत ५ बाद १४८ धावा केल्या. कमिन्स ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननंही २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या.

प्रत्युत्तरात रोहित शर्मा व क्विंटन डी'कॉक यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ९४ धावांची भागीदारी केली. रोहितनं ३५ धावा केल्या.

क्विंटन डी कॉकनं ४४ चेडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या, हार्दिक पांड्यानं ११ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २१ धावा करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.

कोलकाताच्या या पराभवानंतर KKRचा सहमालक शाहरुख खान याची कन्या सुहाना हिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. IPL चे सामने पाहण्यासाठी खान कुटुंबीय दुबईत दाखल झाले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवानंतर सुहानानं दिलेल्या रिअॅक्शनची सोशल मीडियावर चर्चा होती.