UAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL ही UAE ( संयुक्त अरब अमिराती) येथे खेळवण्यात येणार आहे. UAEतील खेळपट्ट्या या संथ आणि फिरकीला साथ देणाऱ्या आहेत. त्यामुळे 13व्या पर्वात फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांना गिरकी घेण्यास भाग पाडणार हे नक्की आहे.

IPL 2020मधील सर्वात महागड्या 10 फिरकीपटूंवर नजर टाकूया...

सुनील नरिन ( Sunil Narine ) - IPL 2020 तील पगारः 12.5 कोटी, संघः कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders), IPLमधील एकूण पगारः 82 कोटी, 74 लाख 78,000.

रशीद खान ( Rashid Khan) - IPL 2020 तील पगारः 9 कोटी, संघः सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad), IPLमधील एकूण पगारः 31 कोटी.

केदार जाधव ( Kedar Jadhav) - IPL 2020 तील पगारः 7.8 कोटी, संघः चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), IPLमधील एकूण पगारः 32 कोटी 29 लाख

आर अश्विन ( Ravichandran Ashwin) - IPL 2020 तील पगारः 7.6 कोटी, संघः दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitaks), IPLमधील एकूण पगारः 64 कोटी 89 लाख

रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) - IPL 2020 तील पगारः 7 कोटी, संघः चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), IPLमधील एकूण पगारः 70 कोटी 1 लाख

पीयूष चावला ( Piyush Chawla ) - IPL 2020 तील पगारः 6.75 कोटी, संघः चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), IPLमधील एकूण पगारः 49 कोटी, 37 लाख

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal ) - IPL 2020 तील पगारः 6 कोटी, संघः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore), IPLमधील एकूण पगारः 18 कोटी 70 लाख

कुलदीप यादव ( Kuldeep Yadav ) - IPL 2020 तील पगारः 5.8 कोटी, संघः कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders ), IPLमधील एकूण पगारः 19 कोटी 10 लाख

अक्षर पटेल ( Axar Patel) - IPL 2020 तील पगारः 5 कोटी, संघः दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals), IPLमधील एकूण पगारः 29 कोटी 67 लाख

कर्न शर्मा ( Karn Sharma) - IPL 2020 तील पगारः 5 कोटी, संघः चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), IPLमधील एकूण पगारः 29 कोटी 67 लाख