चार वर्षांनी संघात परतला अन् त्रिशतक झळकावून विक्रम करून गेला

रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी अविश्वसनीय खेळीचा आनंद मुंबईकरांनी लुटला. उत्तर प्रदेश संघाच्या 8 बाद 625 धावांचा पाठलाग करताना मुंबईचे चार फलंदाज 128 धावांत तंबूत परतले होते. पण, सहाव्या क्रमांकावर आलेल्या सर्फराज खाननं त्रिशतकी खेळी करून मुंबईला आघाडी मिळवून देताना तीन गुणांची कमाई करून दिली.

सर्फराज चार वर्षांनंतर तो पुन्हा मुंबई संघात परतला. 2015-16 या सत्रात त्यानं उत्तर प्रदेश संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता कमबॅक करताना सर्फराज खाननं 391 चेंडूंत 30 चौकार व 8 षटकार खेचून नाबाद 301 धावा केल्या.

मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत त्रिशतक झळकावणारा तो सातवा फलंदाज आहे. सहाव्या क्रमांकावरील ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. मुंबईकडून त्रिशतक झळकावणारे सात फलंदाज कोण, जाणून घेऊया...

377 धावा, संजय मांजरेकर (1991)

359* धावा, विजय मर्चंट ( 1943)

340 धावा, सुनील गावस्कर ( 1982)

323 धावा, अजित वाडेकर ( 1967)

314* धावा, वासीम जाफर ( 1996)

309* धावा, रोहित शर्मा ( 2009)

301 धावा, वासीम जाफर ( 2009)

301* धावा, सर्फराज खान ( 2020)