सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या

Sara Tendulkar friend Grace Hayden DPL 2025: याआधी IPL 2025 मध्ये 'ती' दिसली आहे

दिल्ली प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २ ऑगस्टपासून स्पर्धेचे सामने सुरू होत आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

स्पर्धेचे सर्व सामने दिल्लीतील कोटला मैदानावर होणार आहेत. दिल्ली प्रीमियर लीग २०२५ मध्ये सारा तेंडुलकरची खास मैत्रीण स्पर्धेत स्पोर्ट्स अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

सारा ही मैत्रिण म्हणजे, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन आहे. ती सारा तेंडुलकरची खूपच जवळची मैत्रिण असून, दोघी अनेकदा एकत्र दिसल्या आहेत.

ग्रेस हेडनला दिल्ली प्रीमियर लीग २०२५ ची अँकर बनवण्यात आले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या वतीने ग्रेस हेडनला अलीकडे IPL 2025 मध्येही संधी देण्यात आली होती.

IPLच्या ताज्या हंगामादरम्यान ग्रेस हेडनच्या ग्लॅमरस लूकमुळे चाहते तिच्या प्रेमात पडले होते. सोशल मीडियावरही तिच्याबद्दल चाहते भरभरून लिहिताना दिसले होते.

IPL नंतर आता ती DPL 2025 मध्ये अँकरची भूमिका पार पाडणार आहे. ग्रेस स्वतः याबद्दल खूप आनंदी आहे. या स्पर्धेत अँकरिंग करण्यासाठी तिला लाखो रुपये मिळणार आहेत.

ग्रेस हेडन ही २३ वर्षांची आहे. ती स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि अँकर आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया BGT ट्रॉफीदरम्यान ती कसोटी मालिकेत अँकरच्या भूमिकेत दिसली होती.

सौंदर्याच्या बाबतीत ग्रेस ही अभिनेत्रींपेक्षा जराही कमी नाही. तसेच स्पोर्ट्सची संबंधित असल्याने ग्रेस आपल्या फिटनेसबद्दल विशेष पद्धतीची काळजी घेताना दिसते.