फेव्हरिट वहिनी कोण? बाबर आझमच्या उत्तरावर भडकली सानिया मिर्झा, म्हणाली...

पाकिस्ताने खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यासाठी सज्ज होत आहेत. तत्पूर्वी. पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी होत आहे. 29 पैकी 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याला पत्नी सानिया मिर्झा व मुलग्याला भेटण्याची परवानगी पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) दिली आहे. त्यामुळे मलिक एक महिन्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

पाकिस्तानचा संघ 28 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी, संघाचा कर्णधार बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी इंस्टाग्रामवर गप्पा मारल्या.

या गप्पांमध्ये दोघांनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य गोष्टींवरही गप्पा मारल्या. यावेळी मलिकनं त्याचा एक प्रश्न विचारून अडचणीत आणले आणि त्याच्या उत्तरावर सानिया भडकली.

तुझी फेव्हरिट वहिनी कोण? असा मलिकनं प्रश्न विचारला आणि त्यावर बाबरनं माजी कर्णधार सर्फराज अहमद याच्या पत्नीची निवड केली.

बाबर आझमच्या या उत्तरावर भारताची टेनिस स्टार सानियासर संघाचे गोलंदाज प्रशिक्षक अझर महमूद याची पत्नी इब्बा कुरेशी हिनंही मजेशीर प्रतिक्रिया दिली.