रोहित शर्माचे 'हे' विक्रम विराट कोहलीलाही जमले नाहीत...

विराट कोहलीला धावांची मशिन म्हटले जाते. पण रोहित शर्माचे तीन विक्रम अजूनही कोहलीला करता आलेले नाहीत.

रोहितने कोहलीपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण तरीही रोहितला संघात अजूनही स्थान निश्चित करता आलेले नाही.

रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके लगावली आहेत. पण कोहलीला एकही द्विशतक लगावता आलेले नाही.

रोहितने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात 648 धावा केल्या होत्या. विराटला विश्वचषक सोडाच, पण एकाही एकदिवसीय स्पर्धेत सहाशे धावांचा पल्ला गाठता आलेला नाही.

एका विश्वचषकात पाच शतके लगावण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषकात त्याने हा विक्रम रचला होता. पण रोहितला ही गोष्टदेखील करता आलेली नाही.