चार धावांवर झेल सुटला आणि रोहित शर्माने धू धू धुतला...

रोहितने आजच्या दिवशी एक विश्वविक्रमी खेळी साकारली होती. या सामन्यात रोहितला फक्त चार धावांवर जीवदान मिळाले होते.

रोहित चार धावांवर असताना श्रीलंकेच्या थिसारा परेराने त्याला झेल सोडला होता.

या जीवदानाचा फायदा रोहितने चांगलाच उचचला.

रोहितने इडन गार्डन्सवर २०१४ साली आजच्याच दिवशी झालेल्या एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती.

आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाला करता आली नाही.

आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके रोहितच्याच नावावर आहे रोहितने श्रीलंकेविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक द्विशतक झळकावले आहे.

रोहितच्या २६४ धावांचा विश्वविक्रम कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत मोडता आलेला नाही.