05:15 PM
04:54 PM
04:47 PM
04:44 PM
04:12 PM
04:04 PM
03:56 PM
03:43 PM
Published: February 24, 2021 04:27 PM | Updated: February 24, 2021 04:30 PM
महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) आणि स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहेत. इंडियन लिजंड ( Indian legend) संघाकडून ही दोघंही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( Road Safety World Series ) स्पर्धेसाठी मैदानावर उतरणार आहेत.
तेंडुलकर, युवराज सिंग यांच्यासह या सीरिजमध्ये ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, मुथय्या मुरलीधरन आदी अनेक दिग्गज या सीरिजमध्ये खेळणार आहेत. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश आदी सहा देशांचा या सीरिजमध्ये समावेश आहे.
भारतीय संघाचा पहिला मुकाबला ५ मार्चला बांगलादेश संघाविरुद्ध होणार आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील. १७ व १९ मार्चला स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने होतील, तर २१ मार्चला अंतिम सामना होईल.
६५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमवर ५०टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना नियमांमुळे मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियानं या सीरिजमधून माघार घेतली.
कोरोना व्हायरसमुळे केवळ चार सामने खेळवल्यानंतर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचा पहिला हंगाम स्थगित करण्यात आला होता. महान फलंदाज सुनील गावस्कर हे या सीरिजचे कमिशनर होते आमइ सचिन तेंडुलक सदिच्छादूत होता. देशातील रोड सेफ्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या सीरिजचं आयोजन केलं गेलं आहे.
असं असेल स्पर्धेचे वेळापत्रक
Road Safety World Series 2021: Teams, Schedule, Venue and Timings of The First Edition