Big Breaking : रिषभ पंतनं पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; इंग्लंडच्या कर्णधारावर केली मात

आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या ICC Men’s Player of the Month पुरस्काराचा पहिला मानकरी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) ठरला.

चेन्नई कसोटीत ( India vs England 1st Test) धमाकेदार खेळी करणाऱ्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) ICCनं विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) नुकतेच नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. ICC Player of the Month awards असे या पुरस्काराचे नाव असून प्रत्येकी महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंना तो दिला जाणार आहे.

जानेवारी २०२१साठीच्या पहिल्याच पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन ही नावं आघाडीवर होती. त्यांच्यासह रहमनुल्लाह गुरबाझ ( अफगाणिस्तान) , जो रूट ( इंग्लंड) , स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया), मॅरिझाने कॅप ( दक्षिण आफ्रिका), नॅदीन डी क्लेर्क ( दक्षिण आफ्रिका), निदा दार ( पाकिस्तान) आदी खेळाडूंची नावेही चर्चेत होती.

आयसीसीनं यापैकी केवळ तीनच खेळाडूंना पात्र ठरवले असून त्याची यादी नुकतीच जाहीर केली होती. तीन खेळाडूंमध्ये रिषभ पंत हा टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. त्याच्यासमोर इंग्लंडचा कर्णधार जो रूट व आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान आहे.

जो रूटनं या महिन्यात दोन कसोटींत १०६.५०च्या सरासरीनं ४२६ धावा केल्या. आयर्लंडच्या स्टीर्लिंगनं वन डे सामन्यात १०५च्या सरासरीनं ४२० धावा चोपल्या, तर रिषबनं ८१.६६च्या सरासरीनं २४५ धावा केल्या.

आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या ICC Men’s Player of the Month पुरस्काराचा पहिला मानकरी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ठरला.

तो जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. ( ICC Men’s Player of the Month award for January 2021 ). या पुरस्कारासाठी रिषभसमोर इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) आणि आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान होते.

दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईलनं महिलांमध्ये बाजी मारली. आफ्रिकेकडून ट्वेंटी-20त १०० विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू आहे