रिषभ पंतच्या बहिणीचा सोशल मीडियावर जलवा!, करतेय इंग्लंडमध्ये एन्जॉय; पाहा जबरदस्त फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 04:28 PM2021-06-19T16:28:57+5:302021-06-19T16:36:22+5:30

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचं नेतृत्व करतोय. रिषभ पंत तर आता क्रिकेटमुळे खूप लोकप्रिय तर झालाच आहे. पण त्याची बहीण साक्षीनं देखील अनेकांचं मन जिंकलं आहे.

रिषभ पंत सध्या युवा खेळाडूंच्या गळ्यातील ताईत झालाय. पण त्याची बहीणसुद्धा त्याच्यासारखीच लोकप्रिय होताना दिसत आहे. खासकरुन ती इन्स्टाग्रामवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचं नाव आहे साक्षी पंत. ती सुद्धा सध्या इंग्लंडमध्ये आहे.

साक्षी काही इंग्लंड दौऱ्यावर गेलेली नाही. तर ती तिथंच राहते. इंग्लंडमध्ये ती उच्च शिक्षणासाठी वास्तव्याला आहे.

साक्षी सोशल मीडियात खूप सक्रिय आहे. इंग्लंडमध्ये ती सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतंच तिनं काही सुंदर फोटो पोस्ट केले असून ती सध्या कोर्नवॉल काऊंटीमध्ये गेली आहे.

साक्षी इन्स्टाग्रामवर चांगली सक्रीय असते. तिचे तब्बल ९४ हजार फॉलोअर्स आहेत. तर ती फक्त ३१ जणांनाच फॉलो करते.

साक्षीला फिरण्याची खूप आवड असल्याचं तिच्या पोस्टवरुन दिसून येतं. कधी उंच डोंगराळ प्रदेशात तर कधी बर्फाळ प्रदेशात ती निसर्गाचा आनंद घेताना दिसते.

साक्षी आयपीएलमध्ये अनेकदा मैदानात दिसून आली आहे. रिषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. तर यंदा तो संघाचा कर्णधार देखील होता.

रिषभला प्रोत्साहन देण्यासाठी साक्षी अनेकदा आयपीएल सामन्यांना हजेरी लावताना दिसून आली आहे.

रिषभ सारखीच ती देखील बिनधास्त आणि बेधडक आहे. सोशल मीडियात ती तिच्या डान्सचे व्हिडिओ देखील पोस्ट करत असते. तिच्या डान्समधून तिचा बिनधास्तपणा दिसून येतो.

इंग्लंडमधील सुंदर ठिकाणांना ती आवर्जुन भेट देताना दिसते.

क्रिकेटच्या मैदानात रिषभचा आत्मविश्वास ज्यापद्धतीनं कमालीचा दिसून येतो. तशीच त्याची बहिणी साक्षी देखील खूप साहसी आहे. दुबईत असताना तिनं पॅराग्लाइडिंग देखील केलं होतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!