भारत-पाक लढतीतील 'सुपर फाईव्ह'

आशिया चषक स्पर्धेत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची... 19 सप्टेंबरला हो दोन कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाला नियमित कर्णधार विराट कोहलीची उणीव जाणवणार आहे. असे असले तरी पाकिस्तानविरुद्ध भारताचे पारडे जड मानले जात आहे. या सामन्यात कोणावर असणार लक्ष ? कोण असतील 'सुपर फाईव्ह'?

इंग्लंड दौऱ्यावर भारताचा सलामीवीर शिखर धवनला कसोटी मालिकेत अपयश आले. त्यामुळे त्याच्यावर भरपूर टीका झाली. मात्र हे अपयश मागे सोडून आशिया चषक स्पर्धेत धवन कमबॅक करेल, असा विश्वास आहे. मर्यादित षटकांच्या लढतीत धवनची बॅट तळपली की प्रतिस्पर्धी गोलंदाजांची लय बिघडते.

पाकिस्तानचा इमाम-उल-हक हा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मावर भारतीय संघाची जबाबदारी असणार आहे आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर तो ती सक्षमपणे पार पाडेल.

140 kph च्या वेगाने चेंडू टाकणाऱ्या मोहम्मद आमीरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नवीन चेंडू स्विंग करण्यात तो तरबेज आहे.

भारतीय संघातील सर्वात अनुभवी महेंद्रसिंग धोनी हा भारत-पाक सामन्यातील प्रमुख खेळाडू आहे.