पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय?

इंग्लंड आणि पाकिस्ताना यांच्यातला पहिला कसोटी सामना या आठवड्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी पाकिस्तानी संघानं मँचेस्टर येथे ईद साजरी केली. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले.

पीसीबीनं शेअर केलेल्या फोटोत खेळाडू कुर्ती-पायजमा घातलेले दिसत आहेत आणि नमाजनंतर खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या.

पण, यावेळी नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले. कोरोना व्हायरसच्या संकटात खेळाडूंची अनेकदा चाचणी केली गेली. पण, तरीही ईद साजरी करणाऱ्या खेळाडूंना फॅन्सनी मास्क कुठेय हा प्रश्न विचारला.

पाकिस्तानी खेळाडू इंग्लंडमध्ये जैवसुरक्षिततेत आहेत, त्यामुळे त्यांना कोरोनाची भीती नाही. तरीही फॅन्सनी त्यांना ट्रोल केलं.

Read in English