संघात स्थान मिळण्याची नाही संधी, तरीही घेत नाही अजूनही निवृत्ती

खेळाडूला आपल्याला राष्ट्रीय संघात कधीही स्थान मिळेल, अशी भाबडी आशा असते. पण आपले वय आणि बऱ्याच गोष्टी पाहता आपण निवृत्ती घ्यावी की नाही, याचा विचार त्यांनी करायला हवा.

खेळाडूचे वय झाले असेल, देशाकडून बरीच वर्षे सामना खेळायला मिळाला नसेल तर खेळाडूने आपला निवृत्ती निर्णय घ्यायला हरकत नसावी. पण काही खेळाडूंनी अजूनही आपली निवृत्ती जाहीरही केलेली नाही.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला आता भारतीय संघात स्थान मिळेल, असे कोणाच्या स्वप्नातही येणार नाही. पण तरीही ३९ वर्षाच्या हरभजनने अजूनही आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने आता तर समालोचनानंतर प्रशिक्षण देण्यासह सुरुवात केली आहे. पण तरीही त्याने अजून निवृत्ती घेतलेली नाही.

भारताचा धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणने एकेकाळी चांगलेच मैदान गाजवले होते. पण ३७ वर्षांनंतरही युसूफने निवृत्ती घेण्याचा विचार केलेला नाही.

भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा भारतासाठी २०१६ साली अखेरचा सामना खेळला होता. पण अजूनही त्याने निवृत्ती जाहीर केलेली नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज विनय कुमार सहा वर्षांपासून भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. पण विनय कुमारने अजूनही निवृत्तीचा विचार केलेला नाही.