न्यूझीलंडचा सलामीवीर अडकला विवाहबंधनात

न्यूझीलंडचा सलामीवीर आणि यष्टिरक्षक टॉम लॅथम यानं प्रेयसी निकोल मॅकऑलेय सोबत विवाह केला.

28 सप्टेंबर 2019ला हा विवाहसोहळा पार पडला, पण लॅथमने बुधवारी सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोढी यानेही लग्न केले होते.

लॅथमला नव्या इनिंगसाठी अजाझ पटेल, ल्युकी फर्ग्युसन यांनी शुभेच्छा दिल्या.

लॅथमने 45 कसोटी, 95 वन डे आणि 13 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि 6000 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. त्यात 14 शतकांचा समावेश आहे.

त्यानं 2012मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन वर्षानंतर भारताविरुद्ध त्यानं पहिला कसोटी सामना खेळला.