सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?

most successful Indian captains in test cricket: भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २४ कसोटी सामने खेळले आहेत. यातील भारताने १२ सामने जिंकले आणि ९ सामने गमावले आहेत. तर, तीन कसोटी सामने अनिर्णित ठरले आहेत.

मोहम्मद अझरुद्दीनने ४७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी भारताने १४ सामने जिंकले आणि १४ सामने गमावले आहेत. तर, १९ सामने अनिर्णित ठरले आहेत.

सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये ४९ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी भारताने २१ जिंकले आणि १३ गमावले आहेत. तर, १५ सामने अनिर्णित ठरले आहेत.

महेंद्रसिंग धोनीने ६० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी २७ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आणि १८ सामन्यांमध्ये पराभव पत्करला. भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या यादीत धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली हा भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने एकूण ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी ४० सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आणि १७ सामन्यात पराभव पत्करला. फक्त ११ कसोटी सामने अनिर्णित राहिले.