MI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. 15व्या षटकापर्यंत RCBच्या हातात असलेला सामना किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अलगद MIच्या बाजूने झुकवला.

इशान किशनच्या ( Ishan Kishan) परिपक्व खेळाला पोलार्डच्या अनुभवाची साथ लाभली आणि मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर आले होते. अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देतो की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

सुपर ओव्हरचा थरार

नवदीप सैनी गोलंदाजीला/ हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड फलंदाजीला

पहिला चेंडू - 1 धाव ( पोलार्ड)

दुसरा चेंडू - 1 धाव ( हार्दिक)

तिसरा चेंडू - 0 धाव ( पोलार्ड)

चौथा चेंडू - चौकार ( पोलार्ड)

पाचवा चेंडू - OUT ( पोलार्ड )

सहावा चेंडू - 1 बाय धावा ( हार्दिक)

जसप्रीत बुमराह गोलंदाजी/ एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली फलंदाजीला

पहिला चेंडू - 1 धाव ( एबी)

दुसरा चेंडू - 1 धाव ( विराट)

तिसरा चेंडू - o धाव ( एबी)

चौथा चेंडू - चौकार ( एबी)

पाचवा चेंडू - 1 धाव ( एबी)

सहावा चेंडू - चौकार ( विराट)

Read in English