IPL Auction 2021: आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडे ठरललेले १० खेळाडू कोण? जाणून घ्या...

IPL Auction 2021, Top 10 Expensive Players: आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी लिलाव प्रक्रिया आज चेन्नईमध्ये पार पडली. यावेळी खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. जाणून घेऊयात यंदाच्या लिलावात टॉप-१० महागडे खेळाडू कोण?

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस (Chris Morris) याच्यावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम बोली लागली. ख्रिस मॉरिस तब्बल १६ कोटी २० लाख रुपयांच्या बोलीसह राजस्थान रॉयल्स संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

न्यूझीलंडचा भेदक गोलंदाज कायले जेमिन्सनवर (kyle jamieson) तब्बल १५ कोटींची बोली लावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर (glen maxwell) रॉयल चलेंजर्स बंगळुरू संघानं तब्बल १४ कोटी २५ लाख खर्च केले.

बिग बॅश लीगमध्ये फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला (jhye richardson) संघात दाखल करुन घेण्यासाठी संघांमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. तब्बल १४ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्ज संघात तो दाखल झाला आहे.

के.गौतम (k gautam) यंदा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनकॅप्ट भारतीय खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या के. गौतम याच्यावर चेन्नई सुपरकिंग्ज संघानं तब्बल ९ कोटी २५ लाखांची बोली लावली.

ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज रायली मेरिडिथ (Riley Meredith) याला तब्बल ८ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्ज संघानं आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज संघानं इंग्लंडचा गोलंदाज मोइन अली (moeen ali) याच्यावर ७ कोटींची बोली लावली.

तामिळनाडूचा युवा फलंदाज शाहरुख खानवर (sharukh khan) पंजाब किंग्ज संघानं ५ कोटी २५ लाखांची बोली लावून संघात दाखल करुन घेतलं.

टॉम कुरन (tom curran) याच्यावरही ५ कोटी २५ लाखांची बोली लागली. दिल्ली कॅपिटल्स संघानं टॉम याला संघात दाखल करुन घेतलं.

आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत नेथन कुल्टर-नाइल (Nathan Coulter-Nile) दहाव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर ५ कोटींची बोली लागली आणि मुंबई इंडियन्स संघानं त्याला आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे.