IPL 2021, SRH vs RCB : हातचा सामना गमावल्यानंतर SRHच्या मालकिणबाई भडकल्या, सोशल मीडियावर रुद्रावतार Viral

ipl 2021  t20 SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबाद संघानं ( SRH) बुधवारी हातचा सामना गमवला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं विजयाची आसच सोडली होती, परंतु १७व्या षटकात शाहबाज अहमदनं ( Shahbaz Ahmed) त्यांना नवसंजीवनी दिली. अहमदनं त्या षटकात तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली अन् RCBनं ६ धावांनी सामना जिंकला. SRHच्या पराभवानंतर सीईओ काविया मारन ( Kaviya Maran) हिची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती आणि सोशल मीडियावर सध्या तिचे फोटो धुमाकूळ घालत आहेत. RCBच्या ८ बाद १४९ धावांच्या प्रत्युत्तरात SRHला ९ बाद १४३ धावा करता आल्या. ( Sunrisers Hyderabad CEO Kaviya Maran Kaviya Maran Reaction after Manish Pandey Wicket)