IPL 2021 : खेळाडूच नव्हे, तर आयपीएलमध्ये संजना, नताशा अनुष्कासह 'या' सहा ग्लॅमरस चेहऱ्यांची हवा

Indian Premier League 2021 : आयपीएल म्हटलं की तिथे ग्लॅमरचा तडका आलाच.. त्यात क्रिकेट आणि बॉलिवूड अभिनेत्री हे नातं घट्ट झालेलं आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएलचे सामने प्रेक्षकांविनाच होणार आहेत, त्यामुळे कॅमेरामन्सना सुंदर चेहरा टिपण्याची संधी मिळणार नाही. पण, क्रिकेटपटूंच्या पत्नी व गर्लफ्रेंड्सची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. ( 6 most glamorous WAGs of IPL)

अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) ही आयपीएलमध्ये नेहमी चर्चेत असते. २०१७मध्ये विराट-अनुष्कानं लग्न केलं आणि नुकतंच ही जोडी आई-बाबा बनली. वामिका असे त्यांच्या कन्येचं नाव आहे. त्यामुळे आयपीएल सामन्यात अनुष्कासह वामिकालाही पाहण्यासाठी विराटचे फॅन उत्सुक आहेत.

संजना गणेशन ( Sanjana Ganesan) - मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानं नुकतंच स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत लग्न केलं. आता बुमराहच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर संजना चर्चेत आली तर आश्चर्य वाटायला नको. संजना मॉडेलही आहे.

नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic) - हार्दिक पांड्यानं २०२०च्या सुरुवातीलाच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लॉकडाऊनच्या काळात हार्दिक व नताशानं घरातील मोजक्याच सदस्यांच्या साक्षीनं लग्नही केलं आणि त्यांना अगस्त्या नावाचा लहान मुलगाही आहे. नताशा नेहमीच तिच्या ग्लॅमसर फोटोनी सोशल मीडियावर चर्चेत असते.

धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) - कोरीओग्राफर, डॉक्टर धनश्री वर्मानं भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्यासोबत नुकतंच लग्न केलं. या दोघांची सोशल मीडियावर हवा असतील.

कॅन्डीस वॉर्नर ( Candice Warner) - सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याची पत्नी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. वॉर्नरसोबतचे तिचे टिकटॉक व्हिडीओ तुफान गाजले होते.

जॅसीम लोरा ( Jassym Lora) - अमेरिकन मॉडल जॅसीम लोरा हिनं आंद्रे रसेलसोबत लग्न केलं.

Read in English