IPL 2021 : RR vs PBKS T20 : वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय?

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals Vs Punjab Kings) हा सामना चुरशीचा झाला. PBKS नं ठेवलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RRचा कर्णधार संजू सॅमसननं ( Sanju Samson) वादळी शतक झळकावलं, परंतु अखेरच्या चेंडूवर त्याची विकेट पडली अन् पंजाबनं ४ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात लोकेश राहुल ( ९१), दीपक हुडा ( ६४) आणि संजू सॅमसन ( ११९) यांच्या दमदार खेळीच्या चर्चेत वानखेडे स्टेडियमवर हजर असलेल्या एका सुंदरीची चर्चा सुरू झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे सामने प्रेक्षकांवीना खेळवले जात आहेत. फक्त फ्रँचायझी व बीसीसीआयचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच प्रवेश आहे.

अशात सोमवारी वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीतून ती राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला चिअर करताना दिसली आणि तिच्याबद्दल जाणून घेण्याची नेटिझन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली.

लुसी वेब्बर असे त्या तरुणीचे नाव आहे आणि ती राजस्थान रॉयल्सचा फलंदाज व इंग्लंड क्रिकेट संघाचा उपकर्णधार जोस बटलर याची पत्नी आहे. ती प्रोफेशनली ट्रेनर आहे. २७ ऑक्टोबर २०१७मध्ये तिनं जोस बटलरसोबत लग्न केलं. या कपलला जॉर्जिया रोस नावाची एक कन्या आहे.