IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, पंजाबविरुद्ध चुकल्यास माफी नाही मिळणार!

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पहिल्या सामन्यात CSKच्या गोलंदाजांना उघडे पाडले होते. DCनं तो १८९ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून सहज पार केले होते. त्यामुळे PBKSच्या तगड्या फलंदाजांसमोर आज CSKच्या गोलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सा यूएईत पार पडलेल्या आयपीएल २०२०त साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच धोनीचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नव्हता. त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर CSKच्या गोलंदाजांनी निराशाजनक खेळ केला.

आता त्या चुका सुधारून चेन्नई सुपर किंग्सला आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या ख्रिस गेल, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, दीपक हुडा या तगड्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे.

महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा सामना हा चेन्नई सुपर किंग्सकडून २००वा सामना ठरणार आहे. धोनीनं आतापर्यंत CSKकडून १९९ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी १७५ सामने आयपीएलमध्ये, तर २४ सामने चॅम्पियन् लीग ट्वेंटी-२०त खेळले आहेत. त्यानं ४५०७ धावा केल्या आहेत.

या विक्रमापलिकडे महेंद्रसिंग धोनीच्या मानेवर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे धोनीला १२ लाखांचा दंड भरावा लागला होता. आजच्या सामन्यातही त्याच्याकडून ही चूक झाल्यास त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होईल.

बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक संघाला २० षटकांचा डाव ९० मिनिटांत संपवणे बंधनकारक आहे, पहिल्या चुकीला १२ लाखांचा दंड अन् दुसऱ्या चुकीला एका सामन्याची बंदी अशी कारवाई होणार आहे.