IPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळाला मोठा आधार, स्टार खेळाडू बनला संघाचा मेटॉर

आयपीएल २०२० साठी कसून तयारीला लागलेल्या राजस्थान रॉयल्सला हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा आधार मिळाला आहे.

२००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर आतापर्यंत राजस्थान रॉयल्सच्या संघाला एकदाही या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही, दरम्यान, आता संयुक्त अरब अमिरातीत सुरू होणाऱ्या आयपीएल २०२० चे विजेतेपद पटकावण्यासाठी राजस्थान रॉयल्सचे कंबर कसली आहे.

दरम्यान, आयपीएल २०२० साठी कसून तयारीला लागलेल्या राजस्थान रॉयल्सला हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा आधार मिळाला आहे. या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने आपला माजी कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नला संघाचा ब्रँड अॅम्बॅसेडर आणि मेंटॉर नियुक्त केले आहे.

राजस्थान रॉयल्सने रविवारी याबाबतची माहिती घोषित केली आहे. संघाचा मेटॉर म्हणून शेन वॉर्न मुख्य प्रशिक्षक अॅड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्यासोबत काम करेल. तसेच राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटसोबत मिळून संघाच्या आंकरराष्ट्रीय फॅनबेसला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल.

राजस्थान रॉयल्समधील आपल्या दुहेरी भूमिकेबाबत शेन वॉर्नने सांगितले की, राजस्थान रॉयल्स संघामध्ये परतणे नेहमीच चांगले राहिले आहे. हा माझा संघ आहे. माझे कुटुंब आहे. या फ्रँचायझीसोबत सर्व शेत्रांमध्ये काम करणे चांगले राहील. आम्ही जागतिक स्तरावर एक चांगला संघ तयार करण्याचे काम केले आहे.

या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघात मेंटॉर म्हणून आलो आहे. संघाच्या प्रशिक्षक वर्गामध्ये अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि झुबिन बरुचा यांचा समावेश आहे, यांच्यासोबत येऊन मी समाधानी आहे. आता हा हंगाम आमच्यासाठी यशदायी ठरेल, अशी अपेक्षा मी करतो.

यावेळी आयपीएल चे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आले आहे. या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.