IPL 2020: सूर्यकुमार यादव 'त्या' मुलीचे नृत्य पाहून झाला क्लिन बोल्ड अन् सुरू झाली Love Story!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात सध्या चर्चा रंगतेय ती मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याची...

सातत्यपूर्ण कामगिरी करूनही सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात न निवडल्यानं नेटिझन्स संतापले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्घच्या सामन्यात नाबाद खेळी करून त्यानं मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.

त्या विजयाचं सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीनं करून त्यानं निवड समितीला चपराकच मारली.

हरभजन सिंग, मनोज तिवारी, हर्षा भोगले, दिलीप वेंगसरकर आदींनी सूर्यकुमार यादवची निवड न झाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. सूर्यकुमार आपल्या खेळानं निवड समितिला उत्तर देत आहे.

मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना पळता भुई करून सोडणारा हा फलंदाज कॉलेजमध्ये एका मुलीचे नृत्य पाहून क्लिन बोल्ड झाला झाला होता.

वयाच्या २२ व्या वर्षी सूर्यकुमार १९ वर्षांच्या एका मुलीचा नृत्य पाहून तिच्यावर भाळला होता.

सूर्यकुमार मुळचा वाराणासीचा...वडिलांच्या कामानिमित्त त्याचे कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं. मुंबईतच सूर्यकुमारनं शिक्षण पूर्ण केलं.

तो पोतदार कॉलेजमध्ये शिकत होता आणि २०१२ मध्ये पहिल्यांदाच त्याची भेट देविशाशी झाली.

सूर्यकुमार B.comच्या फर्स्ट इयरला होता, तर देविशानं नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश केला होता.

एका पार्टीत सूर्यकुमार व देविशाची नजरानजर झाली. त्यात देविशाचा डान्स पाहून सूर्यकुमार घायाळ झाला.

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी २०१६ मध्ये विवाह केला.

प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमारने वरातीसाठी २८ लाख रुपयांची कार खरेदी केली होती.

त्यानंतर त्या कारवर १० लाखांचा खर्च करुन तिला देविशाच्या आवडीचा पिवळा रंग दिला होता.

देविशाला त्यानं १.२५ कोटींची डायमंड रिंग भेट दिली होती