IPL 2020: MI Vs SRHच्या सामन्यात शारजामध्ये पडणार चौकार, षटकारांचा पाऊस; या ५ 'बिग हिटर्स'वर असणार नजरा

आज आयपीएलमध्ये दुपारच्या सत्रात मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. धडाकेबाज फलंदाजांची फळी आणि अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणणारा गोलंदाजीचा मारा ही वैशिष्ट्ये असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे पारडे सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पारडे जड मानले जात आहे.

शारजाची पाटा खेळपट्टी असल्याने साधारणपणे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. फलंदाजांवर आवर घालण्यासाठी येथे गोलंदाजांना मोठी कसरत करावी लागते. मात्र या सामन्यात तुफान फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील या 'बिग हिटर्स' खेळाडूंवर नजर राहणार आहे.

सनरायजर्सचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी असल्याने त्याचे खेळणे शंकास्पद आहे. शारजाच्या लहान मैदानावर मोठे फटके मारण्याचे मुंबईचे प्रयत्न असतील. याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाजांना फिरकीपटू राहुल चाहर आणि कृणाल पांड्या यांची चांगली साथ मिळत आहे.

कायरन पोलार्ड- मुंबईचा हिटर म्हणून कायरन पोलर्डची ओळख आहे. तसेच गेल्या दोन सामन्यांपासून पोलार्डने चांगले लय प्राप्त केले आहे. त्यामुळे शारजाच्या मौदानात पोलार्डची तुफान फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.

जॉनी बेयरस्टो- सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोने अबूधाबीमध्ये दिल्ली कॅपिटलस विरूद्ध अर्धशतक ठोकले होते. परंतु शेवटच्या सामन्यात चेन्नईविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे बेयरस्टो शारजाहमध्ये कशी फलंदाजी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

​डेविड वॉर्नर- सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने आतापर्यत लय पकडलेला दिसत नाही. परंतु शारजाच्या लहान असलेल्या मैदानात आज डेविड वॉर्नरवरही लक्ष असणार आहे. दिल्ली केपीटलिजविरुद्ध त्याने 45 धावा, तर केकेआरविरुद्ध 36 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा- मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने आतापर्यत ४ सामन्यात १७० धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितवर देखील नजरा असणार आहे.

हार्दिक पंड्या- मुंबईचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात १ चेंडूमध्ये ३ चौकार २ षटकारांसह ३० धावा कुटल्या होत्या. रोहित बाद झाल्यानंतर पोलार्ड आणि हार्दिकनं २३ चेंडूंत ६७ धावांची अभेद्य भागिदारी रचली होती. हार्दिक शारजामध्येही अप्रतिम खेळ दाखवण्याची संधी आहे.